

Seva & Pooja
Panchamrit Abhishek With Kumkumarchan , Arpan Saree Oti, Naivedya Arpan And Saree Prasad Will Be Send By Post
₹5,001.00
Shri Mahalaxmi Temple, Kolhapur, Maharashtra, India.
Karveer area the present town of Kolhapur city is one of special significance of Shri Mahalaxmi Temple of Kolhapur which, one of the Shakti peetha located in maharashtra state, mention in various puranas of ancient India have listed 108 sites where shakti ( the goddess of power ) is manifested which one is among these,
Get daily blessings, puja updates
Daily Programs
Ghantanaad
- Ringing of the temple bells daily at 4.30am, 8.30am, 11.30am, 7.30pm & 9.30pm before performing abhishek / aaratee seva to inform devotees.
Opening Mandir Doors
- Opening of the temple door at 4.45am
At 5.00am Mukhamarjan, Padya Pooja
- This involves the waking of the deity with a Kakada - torch, to accompaniment of hymns Mukhmarjan, Padya Pooja.
At 5.30am Aaratee Ritual
- Ekarti at 5.45am & kapoor aratee at 6.15am is done called, Kakadarati with butter & coarse sugar naivaidya. Devotional songs in 'Bhup-Rag' are recited at this time.
Daily Darshan















Navratri Darshan

२०_१०_२०२६…
शारदीय नवरात्रोत्सव दिवस १०
श्री महालक्ष्मी ची विजयी रथारुढ सालंकृत पूजा….

आज अश्विन शुद्ध सप्तमी युक्त अष्टमी, रविवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२६
आजची पूजा त्रिगुणात्मिका महालक्ष्मी
अष्टादश भुजा चैषा पूज्या महिषमर्दिनी ।
मध्यम चरित्रात महिषासुर वधावेळी श्रीमातेचे अष्टादशभूजा स्वरूप होते आणि कोल्हासुर वधावेळी देखील श्रीमहालक्ष्मी चे स्वरूप अष्टादशभुजा होते.
अष्टादशभुजा मध्ये वामे चास्या दशानना ।
दक्षिणेsष्टभुजा लक्ष्मीर्महतीति समर्चयेत् ॥
मार्कंडेय पुराणातील वैकृतिक रहस्यात श्रीदेवीच्या पूजा-उपासनेपूर्वी कोणत्या क्रमाने स्थापना करावी, याबाबत निर्देश करताना वरील संदर्भ येतो.यामध्ये अष्टादशभुजा मध्यभागी तर डावीकडे दशानना श्रीमहाकाली व उजवीकडे अष्टभुजा महासरस्वती पूजावी असे म्हटले आहे .
मृत्यू प्रसंगी अंतकाळी कोल्हासुराने श्रीमहालक्ष्मी मातेकडे वर मागितला, “हे वरदायिनी देवि!’ याच ध्यान रूपात तू माझ्या सन्निध अखण्ड राहावेस.” तेव्हा ज्या ठिकाणी श्रीदेवीने कोल्हासुरांस मारले, त्या ठिकाणी देवीची अठराहाती मूर्ती होती असा संदर्भ आढळतो. पूर्वीच्या राजाराम टॉकीज परिसराजवळ असलेल्या गया तीर्थाजवळ ही मूर्ती होती असा संदर्भ आहे.

आज अश्विन शुद्ध सप्तमी, शनिवार दिनांक १७ ऑक्टोबर २०२६
आजची पूजा श्री श्रीवैष्णवीमाता
नमस्ते गरुडारूढे कोल्हासूरभयंकरि ।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते।
श्रीमहालक्ष्मी देवीच्या प्रधान नवशक्तीमधील श्रीवैष्णवीदेवी एक शक्ती आहे. देवी महात्म्यातील आठव्या अध्यायात (रक्तबीज वध) आणि अकराव्या अध्यायात (नारायणी स्तुती) वर्णन आल्याप्रमाणे, दैत्यांच्या संहारासाठी सर्व प्रमुख देवतांच्या शरीरातून त्यांची मूळ शक्ती आणि तेज प्रगट झाले. त्या वेळी भगवान श्रीविष्णूंच्या शरीरातून त्यांची साक्षात शक्ती ‘गरुडारुढ वैष्णवी’ रूपाने प्रगट झाली. श्रीमहालक्ष्मीच्या पारंपारीक अतिमहत्त्वाच्या स्तोत्रातील वरील श्लोकात श्रीदेवीचे गरुडवाहन दर्शवून, या स्वरूपाचा कोल्हासुरास भयनिर्माण करणारी असा कोल्हापूरच्या इतिहासाशी संबंधही दर्शविला आहे.
वैष्णवी देवी चार हाताची असून तिच्या हातात क्रमशः शंख-चक्र- गदा व पद्म आहे. ही एकमुखी असते. देवी महात्म्याच्या नारायणी स्तुती मध्ये
शङ्खचक्रगदाशाङ्र्गगृहीतपरमायुधे।
प्रसीद वैष्णवीरूपे नारायणि नमोऽस्तु ते॥
असे वर्णन आलेले आहे.
अर्थात “हे नारायणी! शंख, चक्र, गदा आणि शार्ङ्ग धनुष्य ही श्रेष्ठ आयुधे धारण करणाऱ्या आणि वैष्णवी रूपात प्रकट असणाऱ्या देवी, तू आमच्यावर प्रसन्न हो; तुला आमचा वारंवार नमस्कार असो.” ही जगताचे पालनपोषण करणारी आहे, तर अधर्म वाढल्यानंतर याच पालनकर्त्या शक्तीचे रूप दुष्टांच्या निर्दालनासाठी संहारक ठरते.

आज अश्विन शुद्ध षष्ठी, शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६
आजची पूजा
श्री स्कंदमाता
स्कन्देन सह संजाता मातृत्वं समुपागता ।
असुरक्षयकारिण्यै नमः स्कन्दमात्रे सदा ॥
कमलासनगता नित्यं पद्मद्वयविभूषिता ।
बालकंमङ्के दधती स्कन्दमाता शुभप्रदा ॥
नवदुर्गा मधील पाचवे रूप स्कंदमाता !
तारकासूर नावाच्या राक्षसाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले की, त्याचा वध केवळ भगवान शिवाच्या पुत्राच्याच हाताने होईल. शिवाने सती देवीच्या देहत्यागानंतर कठोर वैराग्य पत्करले होते, त्यामुळे आपल्याला कोणीही मारू शकणार नाही, असा तारकासुराचा समज होता. देवांच्या विनंतीवरून जगदंबेने हिमालयाच्या पोटी शैलपुत्री (पार्वती) म्हणून जन्म घेतला आणि कठोर तपश्चर्या करून शिवाशी विवाह केला.
शिव आणि पार्वतीच्या तेजातून एका बालकाचा जन्म झाला, ज्याचे पालनपोषण कृत्तिकांनी केले. त्यामुळे त्याला कार्तिकेय म्हटले गेले. याच पुत्राला पुराणांमध्ये स्कंद (तसेच मुरुगन, सुब्रह्मण्य) या नावानेही ओळखले जाते. देवांच्या सैन्याचा सेनापती म्हणून स्कंदाने तारकासुराचा वध केला. अशा पराक्रमी ‘स्कंद’ बालकाला आपल्या मांडीवर घेऊन त्याचे वात्सल्याने पालनपोषण करणाऱ्या आणि विश्वाला मातृत्वाचे दर्शन घडवणाऱ्या देवीच्या रूपाला ‘स्कंदमाता’ असे नाव मिळाले.
स्कंदमाता ही त्रिनेत्रा व चतुर्भुजा असून ” पद्मद्वयविभूषिता ” अर्थात वरील दोन हातात कमळ, खालील उजवा हात वरदहस्त व डाव्या हातात मांडीवरील बाळाला ( स्कंदाला ) धरलेले आहे, असे हे वरदायी व वात्सल्यपूर्ण ध्यान आहे. स्कंद हा देवगणांचा सेनापती आणि बुद्धीची देवता आहे. हा षडानन अर्थात सहामुखाची देवता असून या प्रत्येक मुखाची उपासना व त्याचे फळ वेगवेगळे आहे.
ही शत्रुनाश, अशुभनाश करून विद्या, संतती व अभय देणारी देवता आहे.

गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६
अश्विन शुद्ध पंचमी
गजारूढ अंबाबाई
ललिता पंचमी
श्रीमहालक्ष्मीच्या नित्यक्रमातला सगळ्यात वेगळा दिवस म्हणजे ललिता पंचमी. आजच्या दिवशी देवीचा शृंगार दुपारी बाराच्या आधीच होतो. कारण या दिवशी देवी तिच्या प्रियसखी त्र्यंबुली हिच्या भेटीसाठी निघते. कामाक्ष वध करून करवीराच्या पूर्वेला रुसून बसलेल्या त्र्यंबुलीचा रुसवा काढायला देवी लवाजम्यासह निघते. कोल्हासुर वधाचे प्रतीक म्हणून तिच्या दारात कोहळ्याचा भेद केला जातो. प्रत्यक्ष देवी महालक्ष्मीच्या वचनानुसार श्री महालक्ष्मी समस्त देव, ऋषी, त्यांचे परिवार, श्री त्र्यंबुलीचे दर्शनाकरिता निघालेल्या स्वरूपात आजची पूजा बांधली जाते.
श्रीपूजक
अजिंक्य मुनिश्वर
वेदांग मुनिश्वर
सोहम् दिलीप मुनिश्वर
रवी माईणकर
यांनी ही पूजा बांधली

बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६
करवीर निवासिनी अंबाबाईची कात्यायनी रूपात पूजा
॥ संस्कृत श्लोक ॥
घंटाशूलहलानि शंखमुसले चक्रं धनुस्सायकं हस्ताब्जैर्दधतीं धनांतविलसच्छीतांशुतुल्यप्रभाम्। गौरीदेहसमुद्भवां त्रिजगतामाधारभूतां महापूर्वामित्र सरस्वतीमनु भजे शुंभादिदैत्यार्दिनीम् ॥
…
॥ श्लोकार्थ ॥
हातात घंटा, त्रिशूल, नांगर, शंख, भुसक (मुसळ), चक्र, धनुष्य-बाण व कमळ घेऊन असलेली महासरस्वती, जिचा वर्ण पूर्णचंद्रासारखा, शीतल, पांढरा आहे, अशा गौरीच्या देहापासून उत्पन्न, तिन्ही जगाचा आधार असलेल्या, शुंभादि दैत्यांचा संहार करणाऱ्या देवीला वंदन करतो.
॥ पूजा माहात्म्य व विशेष माहिती ॥
देवीमाहात्म्य या ग्रंथातील उत्तम/उत्तरचरित्राची नायिका ही महासरस्वती कौशिकी आहे. ती अष्टभुजा असून तिने घंटा, त्रिशूळ, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य आणि बाण धारण केले आहेत. तिची अंगकांती शरद ऋतूतील ढगांच्या आडून पडणाऱ्या चंद्राच्या शीतल प्रकाशासारखी अत्यंत तेजस्वी आणि पांढरीशुभ्र आहे.
शुभ आणि निशुंभ यांना मारण्यासाठी ही देवता गौरीच्या/पार्वतीच्या शरीरातून प्रकट झाली. पुढे युदधामध्ये या देवतेच्या मदतीसाठी ब्राह्मी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, चामुंडा, नारसिंही, ऐंद्री आणि शिवदूती या मातृका येतात. देवीमाहात्म्य अंतर्गत वैकृतीकरहस्यामध्ये महासरस्वती कौशिकी मध्यवर्ती पूजायची झाल्यास तिच्या सोबत वर उल्लेख केलेल्या मातृका, गणपती आणि रुद्र पूजावेत असा संकेत आहे.
आजची पूजा
वेदांग मुनिश्वर
अजिंक्य मुनिश्वर अभिषेक मुनिश्वर रवि माईणकर
यानी बांधली


सोमवार, १२/१०/२०२६
अश्विन शुद्ध द्वितीया
करवीर निवासिनी अंबाबाई ची
सर्वस्याद्या महालक्ष्मी रूपात पूजा
महालक्ष्मीर्यदा पूज्या महाकाली सरस्वती ।
दक्षिणोत्तरयो: पूज्ये पृष्ठतो मिथुनत्रयम् ॥
विरञ्चि: स्वरया मध्ये रुद्रो गौर्या च दक्षिणे ।
वामे लक्ष्म्या हृषीकेश: पुरतो देवतात्रयम् ॥
— मराठी अर्थ —
देवीमाहात्म्यअंतर्गत प्रधानिकरहस्यामध्ये सृष्टीक्रमाची माहिती मिळते. त्यानुसार सर्वस्याद्या महालक्ष्मी प्रथम आविर्भाव घेते, त्यानंतर ती तामसी महाकाली आणि सात्त्विकी महासरस्वती निर्माण करते. या तीनही देवता चतुर्भुज सांगितलेल्या आहेत. महालक्ष्मीने महाकाली आणि महासरस्वती यांना सृष्टीच्या उत्पत्तीसाठी पुरुष आणि स्त्री जोडप्यांची निर्मिती करण्याची आज्ञा दिली.
महालक्ष्मीने स्वत: एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुषाचे नाव ब्रह्मदेव आणि स्त्रीचे नाव लक्ष्मी असे ठेवले. महाकालीने एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुषाचे नाव शंकर आणि स्त्रीचे नाव सरस्वती असे ठेवले. महासरस्वतीने एक जोडपे निर्माण केले. त्यातील पुरुषाचे नाव विष्णू आणि स्त्रीचे नाव उमा असे ठेवले. सृष्टीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी ब्रह्माला सरस्वती दिली, विष्णूला लक्ष्मी तर शंकराला उमा दिली.
ही पूजा
श्री. अजिंक्य मुनिश्वर
श्री. वेदांग मुनिश्वर
श्री. सोहम मुनिश्वर
व रवी माईनकर यांनी बांधली.

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६
अश्विन शुद्ध प्रतिपदा
आई करवीर निवासिनी अंबाबाई ची
नंदादेवी रूपात पूजा
— संस्कृत श्लोक —
कनकोत्तम कान्ति: सा सुकान्तिकनकाम्बरा ।
देवी कनकवर्णाभा कनकोत्तमभूषणा ॥
कमलाङ्कुशपाशाब्जै: रलंकृता चतुर्भुजा ।
इन्दिरा कमला लक्ष्मी: सा श्रीरुक्मांबुजासना ॥
— मराठी अर्थ —
सोन्याप्रमाणे अंगकांती असलेली, सोन्याप्रमाणे सुंदर वस्त्र धारण केलेली, सुवर्णवर्णाची आणि उत्तम सुवर्णालंकारांनी अलंकृत असलेली देवी आहे.
कमळ, अंकुश, पाश आणि शंख धारण करणारी, चतुर्भुजा, सोन्याच्या कमळावर विराजमान असलेली इंदिरा, कमला, लक्ष्मी, श्री या नावांनी ओळखली जाणारी देवी अशी तिची महती वर्णन केली आहे.
— नंदा देवीचे स्वरूप वर्णन —
देवीमाहात्म्य अंतर्गत मूर्तीरहस्यामध्ये नंदा देवीचे स्वरूप वर्णन केलेले आहे. त्यानुसार नंदा देवी ही सोन्यासारखी कांती असलेली, सुवर्णमय वस्त्रे व आभूषणे धारण केलेली आहे. ती चतुर्भुज असून तिच्या चार हातांत कमळ, अंकुश, पाश आणि शंख आहेत.
या देवीची नंदजा, कमला, इंदिरा, श्री आणि लक्ष्मी अशी इतर नावे आहेत. मूर्तीरहस्यानुसार या देवीची स्तुती, पूजन व ध्यान केल्याने तीनही लोक वश होतात.
ही पूजा अजिंक्य मुनिश्वर
वेदांग मुनिश्वर
,सोहम दिलीप मुनिश्वर
रवी माइणकर
यांनी बांधली.
Festivals
Sharadiya Navaratrotsav (Nine Devine Nights)
Palakhee Sohala
Lalita Panchami
Nagar Pradakshina
Vijaya Dashami
Rathotsav